Posts

|| श्वास ||

Image
तू जवळून जाताना आलेला तुझ्या केसाचा गंध, विसरलो हे जग मी, अन झालो बेधुंद, वाटले जणू पहिल्या पावसानंतरचा मातीचा वास, भरून गेले मन अन मोहरला श्वास ।। चोरून बघताना मज तुझे हासणे ते मंद, कळलेच नाही कधी मजवर पडले प्रेमाचे बंध, मागायचंय तूज वचन आता एक खास मिसळूदे आता तुझ्या श्वासात माझा श्वास ।। तुझ्याच विषयीच्या विचारांचे मनात चाले द्वंद्व, आत्ताश्या जडलाय मला तुझ्या नावाचाच छंद, जपतोय तुझेच नाव आजकाल मी तासनतास, तुझ्या नावाच्या माळेत मी गुंफलेत माझे श्वास ।। काय सांगू तुला मला मिळे कसा आगळा आनंद, फक्त तुझेच चित्र पाहतो मी डोळे करुनीया बंद, विसरून गेलोय मी क्षण, दिन आणि हे मास, तुझ्याच विचारात कंठतोय मी प्रत्येक माझा श्वास ।। काय सांगू प्रिये तुला तुझी जादूच आहे खास,  जेथे तेथे आहे आता फक्त तुझाच भास, तुझ्याविना अडतोय आता प्रत्येक माझा श्वास ।। शब्दरचना - अवधूत

।। माझीया प्रियेला प्रीत कळेना ।।

Image
बोलता बोलता निःशब्द झाली वाणी,  जेव्हा प्रथम पाहिली मी ती फुलराणी सांगावयाचे काय काही सुचेना, माझीया प्रियेला प्रीत कळेना, चोरून पाहताना तीला केले मी इशारे अनेक, की तिचाच आहे हक्क माझ्या श्वासावर प्रत्येक, माझ्या ह्या खुणांना तिचे मन भुलेना, माझीया प्रियेला प्रीत कळेना, ठेवूनी मनामध्ये आस रचली प्रणय गाणी, कित्येक केले प्रयास अन किती ती बहाणी, काहीहि केले तरी तीस  काहीच रुचेना, माझीया प्रियेला प्रीत कळेना, भाळावरती माझ्या फक्त ओठ तुझे हवेत, दोन्ही हात पसरून घेशील का मज कवेत, हे आर्जव ऐकून देखील तिचे मन का वळेना?, माझीया प्रियेला प्रीत कळेना, नाकारता तू मज आले डोळ्यातून पाणी, सुरु होण्याआधीच राहिली अधुरी हि कहाणी, चुकलो कुठे मी मज काही स्मरेना, माझीया प्रियेला प्रीत कळेना, शब्दरचना - अवधूत जोशी