|| श्वास ||
तू जवळून जाताना आलेला तुझ्या केसाचा गंध,
विसरलो हे जग मी, अन झालो बेधुंद,
वाटले जणू पहिल्या पावसानंतरचा मातीचा वास,
भरून गेले मन अन मोहरला श्वास ।।
चोरून बघताना मज तुझे हासणे ते मंद,
कळलेच नाही कधी मजवर पडले प्रेमाचे बंध,
मागायचंय तूज वचन आता एक खास
मिसळूदे आता तुझ्या श्वासात माझा श्वास ।।
तुझ्याच विषयीच्या विचारांचे मनात चाले द्वंद्व,
आत्ताश्या जडलाय मला तुझ्या नावाचाच छंद,
जपतोय तुझेच नाव आजकाल मी तासनतास,
तुझ्या नावाच्या माळेत मी गुंफलेत माझे श्वास ।।
काय सांगू तुला मला मिळे कसा आगळा आनंद,
फक्त तुझेच चित्र पाहतो मी डोळे करुनीया बंद,
विसरून गेलोय मी क्षण, दिन आणि हे मास,
तुझ्याच विचारात कंठतोय मी प्रत्येक माझा श्वास ।।
काय सांगू प्रिये तुला तुझी जादूच आहे खास,
जेथे तेथे आहे आता फक्त तुझाच भास,
तुझ्याविना अडतोय आता प्रत्येक माझा श्वास ।।
शब्दरचना - अवधूत

Nice poem - you can read more kavita's on - http://www.trendypune.com and http://www.trendypune.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8/
ReplyDeleteखुप सुंदर. ....
ReplyDelete